कल्याण डोंबिवलीत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा…

kalyan – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राज ठाकरे यांच्या मनसेकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आला आहे. मनसेचे माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी पक्षाच्या पाच नगरसेवकांच्या वतीने शिवसेनेला पाठिंबा देण्याची घोषणा केली.

कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर 62 हा बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत. आणि 5 मनसे नगरसेवकांच्या पाठिंब्याने पक्षाची संख्या 58 वर पोहोचली आहे.
राजू पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हण्टले आहे कि, आमच्या शहराच्या विकासकामांना गती मिळावी यासाठी पाठिंब्याचा निर्णय घेतल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच महापालिकेच्या राजकारणात घोडेबाजार होऊ नये,अशी प्रामाणिक इच्छा आमची होती, असंही त्यांनी म्हटलं. राजू पाटील म्हणाले,सत्तेत राहून जनतेची कामे होणे जास्त महत्त्वाचे आहे.
शिवसेनेच्या सर्व ५३ नगरसेवक नवी मुंबईतील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले, जिथे त्यांनी औपचारिकपणे आपला गट नोंदणीकृत केला. दरम्यान, मनसेच्या पाच नगरसेवकांनीही आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आणि शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.


