देशात इंधनाचा तुटवडा नाही – पेट्रोलियम मंत्री…

desh – भारतात कोणत्याही प्रकारे इंधन तुटवडा नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभेत इंधन तुटवड्याच्या मुद्यावर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
दक्षिण आशियातील अनेक देशांनी इंधनावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली असली, तरी भारतातील परिस्थिती स्थिर आणि चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं.
नैसर्गिक वायूचा पुरवठा प्राधान्यक्रमानुसार व्यवस्थापित केला जात असून घरगुती पाइप गॅस आणि वाहनांसाठीच्या CNG ला शंभर टक्के पुरवठा दिला जात आहे. तसेच पर्यायी मार्गांद्वारे LNG चा पुरवठा नियमित सुरू असून, दीर्घकाळ संघर्ष राहिला तरी भारताकडे पुरेसा वायू साठा आणि पुरवठा व्यवस्था असल्याचं त्यांनी सांगितलं.



