ठाणे

ठाणे पोलिसांची मोठी कारवाई; ३ कोटींचे एम.डी ड्रग्ज जप्त…

ठाणे गुन्हे शाखा, घटक – १ पोलिसांनी कल्याण फाटा परिसरात यशस्वी कारवाई करत ₹3.04 कोटी किंमतीचा 1.520 किलो एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त करून एकास अटक केली आहे. सलमान शेख असे याचे नाव आहे.

गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सलमान शेखला कल्याण फाट्याजवळील क्विन्स केअर हॉस्पीटल समोरून रिक्षासहित ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशी आणि अंगझडतीमध्ये त्याच्याजवळ विक्रीसाठी आणलेला ०३,०४,००,०००/- रू. (तीन कोटी चार लाख रुपये किंमतीचा १ किलो ५२० ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) पावडर हा अंमली पदार्थ मिळून आला. सदर अंमली पदार्थ त्याने विक्री करीता अवैधरित्या जवळ बाळगला होता.

सदर प्रकरणी त्याच्याविरुद्ध शिळडायघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ३९५/२०२६, एन.डी.पी.एस. अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडून ड्रग्ज, ऑटो रिक्षा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ₹3.05 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, डॉ. पंजाबराव उगले, पोलीस सह आयुक्त, गुन्हे, ठाणे, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, शेखर बागडे, सपोआ, शोध १, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-१, ठाणेचे वपोनि/अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सहा. पो. निरी./चित्रा चौधरी, पोउपनिरी/प्रकाश शिरसाठ, पोउपनिरी/दिपक जाधव, रविंद्र पाटील, सहा. पोउपनिरी/सुनिल माने, दयानंद नाईक, पोहवा / प्रशांत निकुंभ, नागराज सोनकडे, व्यंकट धायगोडे, शब्बीर फरास, नंदकुमार पाटील, दिपक जाधव, मुकुंद आव्हाड, संदीप महाडीक, धनंजय आहेर, पोशि/सागर सुरळकर, मयुर लोखंडे, अमोल ढावरे व मपोहवा / दिपाली जाधव, मलिका बहिरम व चापोहवा/शशीकांत सावंत यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page