महाराष्ट्र

BEED : वन अधिकाऱ्याला ४५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले…

BEED – बीडमध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवाड यांना ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर, विभागीय वन अधिकाऱ्यास त्यांच्याच घरी ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

पूर्वनियोजित सापळा रचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हि कारवाई केली.

वृक्षलागवडीची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी श्रीनिवास लखमावार यांनी ४५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याची माहिती आहे. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबी कार्यालयात तक्रार दिल्यानंतर एसीबीने सापळा रचून वन अधिकारी श्रीनिवास लखमवाड यांना रंगेहात पकडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page