kalyan

घरफोडी करणारे दोघे अटकेत…

kalyan – घरफोडी करणाऱ्या दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. नदीम लियाकत खान आणि राम प्रकाश गायकवाड अशी या दोघांची नावे आहेत.

कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरात राहणारे तक्रारदार संजय कांबळे यांच्या घराचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरटयांनी तोडून घरातील सोन्याचे व चांदीचे दागिने, गॅस सिलेंडर, मोबाईल, फॅन, रोख रक्कम व इतर साहित्य घरफोडी चोरी करून नेले असल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रा.गु.र.नं.४१८/२०२६ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३३१(३),३३१ (४),३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे नदीम खान आणि राम गायकवाडला अटक केली. आणि त्यांच्याकडून गुन्हयातील चोरीस गेलेले ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने, मोबाईल, ५०००/- रोख रक्कम व इतर मुदद्देमाल असा एकूण ४,५०,०००/- रू. किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदरची यशस्वी कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३. कल्याण अतुल झेंडे, व सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार व पोनि (गुन्हे) विजय खेडकर यांच्या सुचनेप्रमाणे सहा. पो निरी संदिप भालेराव, पोहवा विशाल वाघ, पोहवा गोरखनाथ घुगे, पोहवा जाधव, पोहवा सचिन आव्हाड, पोहवा बुधवंत, पोशि इंगळे, पोशि खरे, पोना दिलीप कोती यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page