डोंबिवली

फेरीवाला निर्मूलन मोहिमेची अंमलबजावणी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही…

dombivali – डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात तसेच प्रभाग परिसरात रस्त्यांवर, पदापथांवरील अनधिकृत फेरीवालांमुळे तिथून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होतो तसेच वाहतुकीचीही कोंडी होते. त्यामुळे अनाधिकृत फेरीवाले हटविणेबाबत महापौर ऍडव्होकेट हर्षाली चौधरी तसेच आयुक्त अभिनव गोयल यांनी सक्त निर्देश सर्व प्रभागाचे सहा. आयुक्त यांना दिले आहेत, त्या अनुषंगाने प्रभागाच्या सहा. आयुक्तांकडून अनधिकृत फेरीवाले हटाव मोहिमेसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे .

असे असतानाही पदपथ, रस्ते व सार्वजनिक जागांवर सातत्याने फेरीवाले बसत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने, ना फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाला निर्मूलन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी न केल्याबाबत ग प्रभागातील कमलाकर सोनवणे आणि रवी बर्वे या कर्मचाऱ्यांवर महापालिका आयुक्त यांनी निलंबनाची कारवाई केली आहे, यापुढेही आपल्या कामात कामचुकारपणा करणार्‍या कर्मचाऱ्यांवर अशीच कारवाई केली जाईल अशी माहिती ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयराम शिंदे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page