ठाणे

bhivandi : पडघा टोल नाक्याजवळ अवैध मद्यसाठा जप्त…

thane – ठाणे जिल्ह्यातील मुंबई – नाशिक महामार्गावर पडघा टोल नाक्याजवळ (ता. भिवंडी) येथे परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली.

या कारवाईत गोवा स्पिरिट ऑफ स्मूथनेस व्हिस्कीच्या फॉर सेल इन ओन्ली मध्यप्रदेश या परराज्यातील विदेशी मद्याचे २ हजार ३६४ बॉक्स मिळून आले. तसेच एमएच १२ टीव्ही ९००० क्रमांक असलेल्या १६ चाकी वाहनासह, दोन मोबाईल फोन असा एकूण २ कोटी ३० हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत वाहनामधील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page