dombivali : पाण्याच्या वादातून सुरक्षारक्षकाची हत्या…

dombivali – पाण्याच्या वादातून एका सुरक्षारक्षकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेला घडली आहे. नळ चालू करून पाणी वाया का घालवतोस? यावरून सुरक्षारक्षक आणि एका तरुणामध्ये वाद झाला आणि या रागातून तरुणाने सुरक्षारक्षकावर धारदार शस्त्राने वार केले. दरम्यान, उपचारावेळी या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, अक्षय जाधव (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. तर उमेश वाघ (वय ३५) असे सुरक्षारक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोपर परिसरातील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात हि घटना घडली. नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवले जात असल्याने सुरक्षारक्षकाने अक्षय जाधव याला जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला आणि अक्षयने रागाच्या भरात व सुरक्षारक्षक वाघ याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. सुरक्षारक्षकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेचा पुढील तपास विष्णु नगर पोलीस ठाण्याचे वपोनिरी राम चोपडे करत आहेत.


