डोंबिवली

प्रियकराची हत्या करून मृतदेह गोणीत लपवला…

dombivali – लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या प्रियकराची धारदार शस्त्राने हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत बांधून बाथरुममध्ये लपवून ठेवल्याची घटना समोर आली आहे.

हि घटना मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये घडली. महिलेने प्रियकराचा खून करून मृतदेह बाथरुममध्ये गोणीत लपवला. नळ सुरू ठेवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. घरमालकाला व्हॉईस मेसेजद्वारे खुनाची कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सदर महिला कोलकात्याला पळून गेल्याची माहिती समोर असून मानपाडा पोलीस तिचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या मलंग रोड परिसरातील काकाचा ढाबा येथील नीलकंठ सोसायटीत ही घटना घडली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या सोसायटीतील एका बंद घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा घर बाहेरून लॉक होते. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, बाथरूममध्ये संशयास्पद गोणी आढळून आली. ती गोणी उघडली असता, त्यात सडलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळला.

त्यानुषंगाने पोलिसांनी तपास केला असता, महिलेने प्रियकराची हत्या डोक्यात वार करून धारधार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर मृतदेह गोणीत भरला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी महिलेने बाथरूमचा नळ २४ तास सुरु ठेवला. सोसायटीत दररोज पाणी सुटले की ते पाणी थेट गोणीवर पडत होते, ज्यामुळे मृतदेह पाण्यात भिजून लवकर सडत होता आणि रक्ताचे डागही वाहून जात होते.

हत्या केल्यांनतर आरोपी महिला थेट कोलकात्याच्या दिशेने फरार झाली. मात्र पळून गेल्यानंतर तिने घरमालकाला एक व्हॉईस मेल पाठवला. या व्हाईस मेलमध्ये तिने म्हटले, फ्लॅटमधील बाथरूमचा नळ चालू राहिला आहे आणि तिथे एक मृतदेह ठेवला आहे. हा व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page