डोंबिवली
नगरसेवक रमेश म्हात्रे विष्णु नगर पोलीस ठाण्यात शरण…

dombivali – शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे विष्णु नगर पोलीस ठाण्यात शरण आले आहेत. त्यांना कल्याण कोर्टात हजर करण्यात आले असून, कोर्टाने १४ दिवसांची न्यायायलीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता त्याची रवानगी आधारवाडी जेलला होणार आहे.

डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे यांचा जामीन मुंबई हायकोर्टाने रद्द केला
आणि त्यांना रविवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांना शरण जावं अन्यथा त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली जावी, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे.
हाय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अखेर रमेश म्हात्रे विष्णु नगर पोलीस ठाण्यात शरण आले.



