मुंबई
कोस्टल रोडवर पोर्शे कारचा अपघात…

mumbai – कोस्टल रोडवर पोर्शे कारचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ८ च्या सुमारास हा अपघात घडला असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कार वेगाने कोस्टल रोडवर धावत होती. दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे चालक थोडक्यात बचावला.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अपघातग्रस्त कार रस्त्यावरून बाजूला हटवली.



