मुंबई

मुंबईत ६ ऑगस्ट पर्यंत जमावबंदी लागू…

mumbai – मुंबई पोलिसांनी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण मुंबई शहरात प्रतिबंधात्मक आदेश (जमावबंदी) लागू केले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची आंदोलने, निदर्शने, मोर्चे काढणे, आणि सभा घेण्यावर पूर्ण बंदी आहे.मिरवणुकांमध्ये लाउडस्पीकर, साऊंड सिस्टिम, वाद्यवृंद (बँड) आणि फटाके वाजवण्यास सक्त मनाई आहे.

या निर्बंधातून लग्नसोहळे, अंत्ययात्रा, शाळा-महाविद्यालयांचे कामकाज, न्यायालयीन कामे, सरकारी कार्यालये आणि दैनंदिन व्यावसायिक कामकाजाला पूर्ण सूट देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page