मुंबई

mumbai : म्हशीच्या दूध दरात ९ रुपयांची वाढ…

mumbai – म्हशीच्या सुट्या दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ झाली आहे. दर ९३ रुपयांवरून १०२ रुपये प्रति लिटर झाला आहे. हे नवे दर १ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात परिसरानुसार ग्राहकांना साधारण ११० ते ११२ रुपये प्रतिलिटर मोजावे लागू शकतात.

मुंबई दूध उत्पादक संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दूध उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, पशुखाद्य, चारा आणि पेंड यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. काही पशुखाद्यांच्या दरात तब्बल २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे वाढत्या खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी दरवाढ करावी लागल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, हे नवे दर १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page