मुंबई

सहा फुटांवरील पीओपी गणेश मूर्तींबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय…

mumbai – मुंबई हायकोर्टाने सहा फुटांवरील गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिले आहे. या आदेशानुसार आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सहा फुटांपेक्षा अधिक उंचींच्या गणेशमूर्तींचं पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये विसर्जन करता येणार आहे.

मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सहा फुटांपेक्षा अधिक उंचींच्या गणेशमूर्तींचं पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये विसर्जन करता येणार आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने २४ जुलै २०२५ रोजी दिलेला आपला आदेश कायम ठेवला आहे. तसेच याबाबत अंतिम निकाल येईपर्यंत हा निर्णय लागू राहील, असेही कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यामुळे मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह उंच पीओपी मूर्तींची प्रतिष्ठापना करणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर सहा फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करणे बंधनकारक राहणार आहे. राज्य सरकारने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page