चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस अटक…

dombivali – चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर पोलिसांनी अटक केली. विक्रम शिवाजी पवार उर्फ विकी पवार असे याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णूनगर पोलीस ठाणे हद्दीतील सन २०१८ मध्ये दाखल चोरीच्या गुन्ह्यातील हा पाहिजे आरोपी आहे. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा पोलीस विष्णू नगर पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलींग करीत असताना विष्णू नगर पोलीस स्टेशन गु.र.नं. 143/2018 भादंवि कलम 380 प्रमाणे या गुन्हयातील पाहिजे आरोपी विक्रम शिवाजी पवार उर्फ विकी पवार हा डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्ती नगर, झोपडपट्टी शेलार नाका येथे असल्याची माहिती पोहवा हेमंत राणे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन विक्रम शिवाजी पवार उर्फ विकी पवार यास ताब्यात घेतले आणि पुढील कारवाई साठी विष्णू नगर पोलीस स्टेशन येथे जमा केले.
सदरची यशस्वी कामगिरी वपोनिरी शैलेश साळवी (खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा हेमंत राणे, पो.हवा.पाटील, पोशि रोहन म्हात्रे, चापोहवा भगवान हिवरे यांनी केली.



