dombivali : तरुणीला ब्लॅकमेल करून लग्न करण्याचा प्रयत्न…

dombivali – एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यानतंर तिचे शोषण करून तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेख या तरुणाला अटक केली असून, त्याच्यावर पोक्सो (POCSO) आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, तीन वर्षांपूर्वी सदर मुलीची एका व्हिडिओ ऍपच्या माध्यमातून अरमान शेख याच्याशी ओळख झाली होती. अरमान शेख हा टेलरिंगचे काम करतो. त्याने या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी शारिरीक संबंध ठेवत लग्नाचा तगादा लावला होता.
दोघांमध्ये जवळपास तीन वर्षे प्रेमसंबंध होते. मुलीच्या वयाची १८ वर्षे होताच लग्न करण्याचे ठरविले. हा विवाह भिवंडीतील शांतीनगर येथे होणार होता. लग्नासाठी काजी आणि साक्षीदार पोहचले. याचेळी हिंदूवादी कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धडक दिली. हिंदू मुलीशी लग्न करतो म्हणून त्याठिकाणी मोठा गोंधळ झाला, दरम्यान, हे प्रकरण डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्याशी संबंधित असल्याने शांतीनगर पोलिसांनी तरुण तरुणीला विष्णूनगर पोलीस ठाण्याकडे पाठविले.
त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये तरुणीने अरमान खान याच्याविरोधात तक्रार दाखल केली. अरमानने आधी मैत्री केली. त्यानंतर शारीरीक संबंध ठेवले. तसेच ब्लॅकमेल करुन लग्नासाठी तगादा लावित होता असे तरुणीने सांगितले. अखेर या प्रकरणात अरमान शेख या तरुणाला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात पोक्साे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


