ठाणे
भिवंडी महापालिकेच्या महापौर पदी नारायण चौधरी विराजमान…

bhivandi – भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांची निवड झाली असून, त्यांना एकूण ४८ मतं मिळाली. पीठासीन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली.

या निवडणुकीत स्पष्ट बहुमताने चौधरी विजयी ठरले. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेदवार तारिक मोमीन हे बहुमताने विजयी झाले आहेत.
नारायण चौधरी यांनी बंडखोरी करत काँग्रेसप्रणीत ‘सेक्युलर फ्रंट’च्या पाठिंब्यावर महापौर पदी विजय मिळवला.



