मुंबई

दहावीच्या परीक्षेला आज पासून सुरुवात…

mumbai – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा आज, २० फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी राज्यातील 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रातील एकूण 5 हजार 111 मुख्य केंद्रां वर ही परीक्षा पार पडणार आहे. राज्यातील, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण, अशा 9 विभागांतून ही परीक्षा होत आहे.

कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी व्यापक तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती राज्य परीक्षा मंडळाकडून देण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी राज्यात 271 भरारी पथके नियुक्त करण्यात आलीये. दरम्यान कॉपीसाठी मदत करताना कुणी कर्मचारी आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंडळाने दिलाय…

दरम्यान, दहावी बोर्ड परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page