नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू…

navi mumbai – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवार, १५ जुलैला पहिल्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानसेवेची सुरुवात झाली. अबूधाबीहून आलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे आयएक्स २०८ हे विमान सकाळी १०.२० वाजता विमानतळावर उतरले. या विमानाचे पारंपरिक वॉटर कॅनन (पाण्याच्या तोफांनी) सलामी देऊन स्वागत करण्यात आले. अबूधाबी-नवी मुंबई या मार्गावर प्रारंभी आठवड्यातून तीन उड्डाणे होणार आहेत.

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनदेशांतर्गत विमानसेवा डिसेंबर महिन्यात सुरू झाली होती. त्यानंतर अवघ्या २०० दिवसांत विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणाची सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यामुळे पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील उद्योग, लॉजिस्टिक्स, पर्यटन, हॉटेल व्यवसाय तसेच बांधकाम क्षेत्राला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page