नवी मुंबई
नवी मुंबई एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग…

navi mumbai – महापे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली. आगीच्या भयंकर ज्वाळा आणि धुराचे लोट निघताना दिसत आहेत.
परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.



