महाराष्ट्र
भरत गोगावलेंचा मुलगा पोलिसांना शरण…

raigad – आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अखेर महाड पोलिसांना शरण आले आहेत. मागील दीड महिन्यांपासून फरार असलेले विकास गोगावले महाड शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. मुंबई हायकोर्टाने खडसावल्यानंतर ते पोलीस ठाण्यात हजर झाले.
महाड नगरपालिका निवडणुकी दरम्यान दोन राजकीय गटात हाणामारी झाली होती. गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. जोरदार राडा झाला होता. या प्रकरणात अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल असून, त्यात विकास गोगावलेंचा समावेश आहे. राड्यानंतर विकास गोगावले फरार होते.
दरम्यान, मुंबई हायकोर्टाने खडसावल्यानंतर अखेर भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले हे पोलिसांना शरण आले.



