महाराष्ट्र

वृद्धाची लाखो रुपयांची फसवणूक…

badlapur – एका वृद्धाची लाखो रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. बदलापूर शहरात हि घटना घडली आहे. काळी जादू, मृत्यू आणि पिशाच्च याची भीती घालून जवळजवळ ९ लाख ७२ हजार रुपये लुटले असून सोन्याचे दागिने देखील पळवले आहेत. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव चंद्रकांत चिले असून, ते एका कार्यक्रमासाठी बदलापूरला आले असताना, चार भोंदू ज्योतिषांनी त्यांना गाठले आणि आपल्या जाळ्यात ओढले. आरोपींनी चिले यांना सांगितले की, तुमच्या घरावर कुणीतरी पिशाच्च सोडला आहे. तुमच्या घरात नुकताच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि लवकरच दुसऱ्या व्यक्तीचाही मृत्यू होणार आहे. हे थांबवायचे असेल तर देवीची पूजा करावी लागेल आणि घरात सोन्याचे चार खिळे ठोकावे लागतील.या भीतीच्या आहारी जाऊन चिले यांनी आरोपींच्या सांगण्यावरून तब्बल ९ लाख ७२ हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही दिले. काही दिवसांनी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे चार जणांना अटक केली. ब्रम्हदत्त इंगळे, शिवलिंग इंगळे, भवानी इंगळे आणि रोहित शिंदे अशी यांची नावे आहेत. दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page