मंत्रालयातील कार्यालयावर ACB चा छापा…

mumbai – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर एसीबीने छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत एसीबीने दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले तसेच कार्यालय सील केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. राजेंद्र ढेरंगे असे या लिपिकाचे नाव आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदाराच्या मेडिकल लायसन्सचे (वैद्यकीय परवाना) निलंबन रद्द करून देण्यासाठी राजेंद्र ढेरंगे यांनी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर लाचेची रक्कम ३५ हजार रुपये ठरवण्यात आली. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ढेरंगेने आपल्या कार्यालयात ही रक्कम स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ढेरंगे यांच्यासह कार्यालयातील आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.



