नवी मुंबई

घणसोली डेपोतील बसला भीषण आग…

navi mumbai – घणसोली एमआयडीसी परिसरात असलेल्या बस डेपोमधील बसला सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत ४ बस जळून खाक झाल्या आहेत. यात १ इलेक्ट्रिक तर ३ डिझेल बसचा समावेश आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच आगीचे कारण अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या आगारात १ इलेक्ट्रिक बस देखभाल दुरुस्तीसाठी उभी होती या बसला अचानक आग लागली. आणि या बसला लागून उभ्या असलेल्या तीन बस अशा मिळून ४ बसला आग लागली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page