देश
RCBच्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी…

karnataka – RCB च्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेंगराचेंगरीत ८ ते १० जणांचा मृत्यू तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या संघाने IPL 2025 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरू शहरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला बंगळुरू संघाचे संपूर्ण खेळाडू उपस्थित होते. त्यांना पाहण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर हजारो लोक जमा झाले होते. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ८ ते १० जणांचा मृत्यू तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.