MUMBRA : मित्रांनीच केली मित्राची हत्या…

thane – दोन मित्रांनी एका मित्राची निर्घृण हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओळख लपवण्यासाठी त्याचे शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करण्यात आले होते. याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट – 4 पोलिसांनी फैज सुलतान मालीम आणि त्याचा भाऊ अल्बान मालीम या दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अमन मुस्कीन शेख असून, आरोपींनी हत्येचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचे देखील उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील खर्डी गावाजवळील निर्जन परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करण्यात आले होते.
याप्रकरणी पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे फैज सुलतान मलिक आणि अल्बान सुलतान मलिक या दोघांना ताब्यात घेतले. आणि त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी जुन्या वादातून आपला मित्र अमन मुस्कीन शेख याची हत्या केल्याची कबुली दिली. सदर प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.



