कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

kalyan – कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संघटितपणे वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा कल्याण पोलिसांनी पर्दाफाश केला असून, टोळी प्रमुख मुख्य आरोपीसह कल्याण पोलीसांनी मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करत ८ जणांना अटक करून एकूण २० पिडीत महीलांची सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा रजि. नं. १०७/२०२६ बी.एन. एस. कलम १४३ (३), ३ (५), सह स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ४,५ या गुन्हयात अटक करण्यात आलेले महिला आणि पुरुष आपसात संगनमत करुन एकूण २० पीडित महीलांना वेश्याव्यवसायासाठी भाग पडून, पैशाचे आमिष दाखवून, त्यांचा अपव्यापार करत होते. तसेच त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१) (ii), ३ (२), ३(४) प्रमाणे देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कल्याण पोलिसांनी या गुन्ह्यात ५ महिला आरोपींना अटक केली होती. त्यानंतर सदर गुन्हयात फरार असलेला आरोपी (टोळी सदस्य) प्रशांत उर्फ कवा विरकुमार गायकवाड याला गुप्त माहितीच्या आधारावर अटक केली. त्यानंतर पुन्हा गुन्हयातील संघटित टोळीचा मुख्य आरोपी तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद आणि फरार आरोपी मिता नारायण बारीक (टोळी सदस्य) या दोघांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली.
सदर गुन्हयात एकूण २० पिडीत महीलांची सुटका करण्यात आली असून, गुन्हयातील सर्व ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, संजय आधव, अपर पोलीस आयुक्त, पूर्प्रादेशिक विभाग, कल्याण यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अतुल झेंडे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण यांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली करण्यात आली असून, गुन्हयाचा पुढील तपास अशोक होनमाने सपोआ. कल्याण विभाग हे करीत आहेत.



