डोंबिवलीतील रिगल बारवर मध्यरात्री पोलिसांची धाड; बारमध्ये २३ मुली…

dombivali – डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या रिगल बारवर मध्यरात्री कारवाई करण्यात आली आहे. एसीपी सुहास हेमाडे यांनी स्वतः पथकासह धाड टाकत या बारवर कारवाई केली. त्यावेळी त्यांच्यासोबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय गुंड, API संपत फडोळ, API के. आर. पाटील तसेच इतर अधिकारी होते.

रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास रिगल बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषांगाने एसीपी सुहास हेमाडे यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचत अचानक तपासणी केली. त्यावेळी त्या बारमध्ये २३ मुली आढळून आल्या.
सदर प्रकरणी संबंधित व्यवस्थापन व इतरांविरोधात मानपाडा पोलीस ठाणे येथे गु.रजि.न.१९९/२६ भा.न्या.स.क 296,223,54,3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.



