नवी मुंबई
नवी मुंबईत इमारत कोसळली…
Navi Mumbai – नवी मुंबईत इमारत कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास बेलापूर येथील शहाबाज गावातील ४ मजली ‘इंदिरा निवास’ इमारत कोसळली. या घटनेत दोघांना बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बचावकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इमरातील अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील नागरिक बाहेर पडले पण ३ नागरिक यामध्ये अडकले. त्यातील दोघांना बाहेर काढण्यात आले असून, एकाचा शोध सुरू आहे.