डोंबिवली
KDMC चा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात…

dombivali – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत पाटोळे असे याचे नाव असून, तो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत लिपिक पदावर काम करत आहे .
अग्निशमन विभागाच्या ना हरकत दाखल्यासाठी पाटोळे याने शाळेकडून 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत शाळेने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचत पाटोळे याला लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले.


