मुंबई
बच्चू कडूंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश…

mumbai – प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कडू यांनी धनुष्यबाण हाती घेतला. कडूंसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर शिंदे यांनी लगेच विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून बच्चू कडू यांच्या नावाची घोषणा केली.

पक्ष प्रवेश झाल्यानंतर बच्चू कडू म्हणाले की, फक्त आमदारकीसाठी नव्हे तर मुद्याच्या लढाईसाठी हा पक्ष प्रवेश केला आहे. ही लढाई पदासाठी नसून लोकांच्या मुद्यांची लढाई आहे. या राज्यात ठिकठिकाणी कामगार-शेतकऱ्यांसाठी शिवसेना उभी करू.
आमचा झेंडा बदलला असला तरी आमचा अजेंडा कायम राहणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.



