kalyan : आंबिवली परिसरातील अनधिकृत बांधकामाबाबत सहाय्यक आयुक्तांना माहिती देऊनही कारवाई नाही…

kalyan – कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील १/अ प्रभागातील बाळकृष्ण पेपर मिल आंबिवली परिसरात अनधिकृत बांधकाम सुरू आहे. याठिकाणी जवळपास सहा ते सात रूम बांधून तयार झाले असून, त्या रूममध्ये लोक राहायला सुद्धा आले आहेत. यासंदर्भात १/अ प्रभाग सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांना माहिती देण्यात आली आहे. पण अजूनही त्यांनी या अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई केलेली नाही. तर वॉर्ड ऑफिसर अजून कागदावरच कारवाई करत आहेत.
तसेच याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन ने संबंधित वॉर्ड ऑफिसर महोदयांना लेखी पत्र देऊन याठिकाणी कारवाई करावी अन्यथा सदर ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो असे कळविले आहे. पण तरीही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामावर आयुक्त जयवंत चौधरी यांची विशेष कृपादृष्टी आहे असे दिसून येते. कदाचित चौधरी यांचे या बांधकामधारकांशी काहीतरी लागेबंध असावेत म्हणून ते कारवाई करत नाहीत.
दरम्यान, सदर परिसर हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरांचे कार्यक्षेत्र आहे. अंदाजे दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर महापौरांचे कार्यालय आहे. तरीसुद्धा हे भूमाफिया बिनधास्त अनधिकृत बांधकाम करत आहेत. त्यांना कोणाचेही भय राहिलेले नाही हे दिसत आहे.



