Maharashtra : बारावीचा निकाल जाहीर!…

mumbai – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली असून, राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे.
त्यात ९३.१५ टक्के मुली तर ८६.८० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. ९४.१४ टक्क्यांसह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर लातूर विभाग सर्वात मागे राहिला आहे.

यावर्षी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागातून १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
विभागीय निकाल…
पुणे – 91.25
नागपूर – 88.67
छत्रपती संभाजीनगर – 8868
कोल्हापूर – 89.97
अमरावती – 90.92
नाशिक – 90.72
लातूर – 84.14
कोकण – 94.14
मुंबई – 90.08
दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
या वेबसाइटवर पाहा निकाल!
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsscboard.in



