pune : रिक्षा चालकावर कोयत्याने वार…

pune – पुण्यात भरदिवसा एका रिक्षा चालकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. कात्रज चौक ते नवले ब्रिज हायवेवरील राजमाता भुयारी मार्ग, दत्तनगर चौक येथे हि घटना घडली असून, रिक्षा चालकाला कोयत्याने मारहाण करून पुलावरून खाली फेकले.
या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. बापूसो भोसले, गणेश धारपले आणि गणेश उर्फ भावड्या धरपाळे अशी या तिघांची नावे आहेत. तर सुरज काळे असे हल्ल्यात जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक सुरज काळे आणि आरोपींमध्ये प्रवासी भरण्याच्या कारणावरून मोठा वाद झाला होता. जुन्या वादाचा राग मनात धरून या तिघांनी दत्तनगर चौकात सुरजला गाठले आणि त्याच्यावर धारदार कोयत्याने वार केले. या हल्ल्यात सुरज काळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



