kalyan

kalyan : पोलिसाकडून वकिलाला मारहाण…

kalyan – एका पोलिसाने वकिलाला मारहाण केली असल्याची घटना कल्याण कोर्ट परिसरात घडली. पार्किंगच्या किरकोळ वादातून हि मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कोर्ट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण कोर्ट परिसरात दुचाकी काढण्यावरून ॲड. प्रक्षित अडांगळे आणि तेथे असलेले चौधरी पोलीस यांच्यात वाद झाला. आणि या वादातून पोलिसाने ववकिलाला मारहाण केली. तेथील उपस्थितांनी मध्यस्थी करून वाद सोडविला.

या प्रकरणी न्यायाधीशांना तक्रार करण्यात आली असून, या पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, सदर पोलिसाने दारू पिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page