शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विकास लवांडे यांना अटक…

pune – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पोस्ट करून या प्रकरणाची माहिती दिली. खोट्या प्रकरणात आपल्याला अटक करण्यात आली असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे. लवांडे यांनी पोलिसांच्या गाडीत बसलेला फोटोही शेअर केला आहे. अटकेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.
अटक केल्यानंतर विलास लवांडे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो.
कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय? असा माझा सवाल आहे? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही.
सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस #वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत. असं विकास लवांडे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे.



