kalyan

kalyan : ३४ कोटींचे हेरॉईन जप्त…

kalyan – कल्याण मध्ये ९.७ किलो वजनाचे ३४ कोटींचे हेरॉईन अंमली पदार्थ जप्त करून मुख्य पुरवठादारासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३, कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकाने हि कारवाई केली असून, अमजद युसुफ पठाण (मुख्य पुरवठादार), कासिम अब्दुल सत्तार वसईकर, कृष्णा नागप्पा हळेमणी, गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा, सद्दाम गफुर शेख अशी या पाच जणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे, डिलर व अभिलेखावरील पाहिजे/फरारी आरोपीतांचा शोध घेवुन त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे अनुषंगाने गस्त करत असताना, गस्ती दरम्यान, पोलिसांना कल्याण पश्चिमेतील स्मशान भुमी जवळ, सांगळे वाडी कडे जाणाऱ्या रोडवर, दोन इसम आढळुन आले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याजवळ ९ किलो २३६ ग्रॅम वजनाचा हेरॉईन आणि ३९,०००/- रु. रोख रक्कम असा एकूण मिळून आला. रु.३२,३२,९९,०००/- मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हयाचे पुढील तपासात कासिम अब्दुल सत्तार वसईकर याच्या घर झडतीमध्ये ५३१.६९ ग्रॅम वजनाचा रु.०१,८५,८५,०००/- किंमतीचा हेरॉईन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

तसेच गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा आणि सद्दाम गफुर शेख याला यापूर्वी अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी अमजद युसुफ पठाण यास २१ मे रोजी अटक करण्यात आली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, ठाणे शहर, आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकातील सपोनि/अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस उप निरीक्षक/जितेंद्र ठोके, पो. हवा./देवरे, पो. शि/राहुल शिंदे, पो.शि./अमित शिंदे, पोशि/बिरपन, पोशि/ खांडेकर व पो. शि/ खरसाण यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page