उल्हासनगरमध्ये २१ किलो गांजा जप्त…

ulhasnagar- उल्हासनगर कॅम्प १ परिसरात २१ किलो गांजा जप्त करून तिघांना अटक करण्यात आली आहे. पेट्रोलिंग दरम्यान उल्हासनगर गुन्हे शाखेने हि कारवाई केली असून, गांजा, रिक्षा आणि ३ मोबाईल असा एकूण ९ लाख ३५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना पेट्रोलिंग करत असताना उल्हासनगर कॅम्प १ येथील अमरडाय कंपनी बाहेरील रस्त्यावर एक रिक्षा आढळून आली तिची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. २१ किलो ५८४ ग्राम वजनाचा हा गांजा असून, त्याची किंमत ८ लाख ६३ हजार ३६० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करून, हिदायतुल्ला बिसमिल्ला शेख, बिकास बिकरम रणबैसा आणि सुधीर धरूबा रणबैसा या तिघांना अटक करून, गांजासह ९ लाख ३५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, उडीसा राज्यातून हा गांजा आणल्याची माहिती समोर आली असून, अंबरनाथ मधील बाबू खान नावाच्या व्यक्तीस हा गांजा विक्रीसाठी नेण्यात येत होता.



