वाहन चोरी करणाऱ्यास विष्णुनगर पोलिसांनी केली अटक…

dombivali – वाहन चोरी करणाऱ्या एकास विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक करून त्याच्याकडून दोन रिक्षा आणि एक स्कुटी जप्त केली आहे. आदर्श बागडे असे याचे नाव आहे.
माहितीनुसार, पोलिसांनी त्याला CR no 136/26 या रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यात चोरी झालेली रिक्षा जप्त केली तसेच त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून अंबरनाथ पो.ठाणे CR no 199/26 या गुन्ह्यात चोरी गेलेली स्कुटी आणि सेंट्रल पोलीस ठाणे CR no 268/26 या गुन्ह्यात चोरीस गेलेली रिक्षा जप्त केली.
सदर प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाणे डीबी पथकाने दोन रिक्षा आणि एक स्कुटी, असा एकूण 2,70,000/-रु.चा मुद्देमाल सराईत वाहन चोराकडून जप्त केला.
दरम्यान, यापूर्वी आरोपी आदर्श बागडे याच्यावर तीन गुन्हे (विष्णुनगर, नौपाडा, कोपरी) दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.



