मुंबई

सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवड…

mumbai – विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी महायुतीचे उमेदवार सचिन अहिर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी महायुतीकडून सचिन अहिर तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र सभागृहाची परंपरा जपत ही निवडणूक एकमताने व्हावी, अशी विनंती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ती मान्य करत मविआच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला.

त्यानंतर प्रविण दरेकर, संजय खोडके आणि मनिषा कायंदे यांनी सचिन अहिर यांच्या बिनविरोध निवडीसाठी प्रस्ताव मांडला. त्यानंतर सभापतींनी त्यांची उपसभापतीपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन अहिर यांचे अभिनंदन करत ते या पदाला न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त करत सचिन अहिर सभागृहाची परंपरा पुढे नेतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

या निवडीनंतर सचिन अहिर यांनी सर्वांचे आभार मानत सभागृहाची उज्ज्वल परंपरा कायम राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page