pune : विषारी दारू पिल्यामुळे अनेकांचा मृत्यू…

pune – पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे विषारी दारु पिऊन जवळपास १२-१३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा मृत्यू झाला असून, पुण्यातील काळेपडळ भागात तीन तर हडपसर भागात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरातील दारू प्राशन केलेल्या काही जणांचा तोंडाला फेस येऊन मृत्यू झाल्याची माहिती आहे. दारूत मिथेनॉल मिसळल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे
पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी योगेश वानखेडेसह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. मृत्यूमुळे अनेक परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कोणतीही हयगय न करण्याचे आणि कडक कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहे.



