ठाणे

ठाण्यात ३ जूनला १२ तास पाणी पुरवठा बंद…

thane – ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र तसेच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशनमध्ये पावसाळ्यापूर्व आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आणि अन्य तांत्रिक कामांचा समावेश असून, ही कामे बुधवार दि. ३ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत.

या कामांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. स्टेम) प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्याचा १२ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटरनिटी जंक्शन, मुम्ब्रा तसेच कळव्याच्या काही भागांमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

या शटडाऊननंतर पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page