शाळेच्या बसवर झाड कोसळलं…

mumbai – चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत ४ ते ५ विद्यार्थी जखमी झाले. तर एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर येथील ११ नंबर रोडवर हि घटना घडली. हि बस मुलांना घरी सोडण्यासाठी जात होती त्यावेळी अचानक शाळेच्या बसवर पिंपळाचं भलंमोठं झाड कोसळलं आणि हि दुर्दैवी घटना घडली. बसमध्ये १२ ते १५ विद्यार्थी होते. झाड कोसळल्याने बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

दरम्यान, बस कंडक्टर आणि स्थानिक नागरिकांनी बसमध्ये असलेल्या मुलांना सुखरूप बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर एक मुलगा बसमध्ये अडकला होता. घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरु केले.



