मुंबई

बेस्ट कर्मचारी संपावर…

mumbai – कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १२ संघटनांचा समावेश असलेल्या बेस्ट संयुक्त कृती समितीने बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे परिवहन सेवेवर परिणाम झाला असून, मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बसेस धावताना दिसत नाहीयेत. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खासगीकरणाला विरोध आणि प्रलंबित मागण्यांसाठी हा संप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कृती समितीने मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे.

माहितीनुसार, बेस्टच्या विद्युत आणि परिवहन दोन्ही सेवांचे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या आणि बेस्टच्या खासगीकरणाला विरोध म्हणून बेस्टचे सर्व कामगार कामाच्या ठिकाणी हजार राहतील. मात्र, कोणतेही काम करणार नाहीत.

औद्योगिक न्यायालयाने बेस्ट उपक्रमाच्या बाजूने अंतरिम आदेश देत बेस्ट कामगार संयुक्त कृती समिती अंतर्गत संपात सहभागी असलेल्या संघटनांना पुढील आदेशापर्यंत संपावर जाण्यास तात्पुरती मनाई केली आहे. त्यानंतरही बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीकडून प्रलंबित मागण्यांवर निर्णय होईपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page