डोंबिवली

dombivali – KDMC च्या कचरा डेपोतील घंटागाडीत आढळला महिलेचा मृतदेह…

dombivali – डोंबिवली जवळील खंबळपाडा येथील KDMC कचरा डेपोमध्ये एका घंटागाडीत महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. दुर्गंधी येत असल्याने तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

घटनेची माहिती मिळताच डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी टिळक नगर पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला.

मिळालेल्या माहितीनुसार, घंटागाडीतील कचऱ्याची विल्हेवाट लावत असताना कर्मचाऱ्यांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी तपासणी केली असता त्यांना अडगळीत असलेल्या बंद घंटागाडीत ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या आढळून आला.

दरम्यान, मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page