मुंबई

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात; वाहने एकमेकांवर आदळली…

mumbai – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मिसिंग लिंकच्या बोरघाट येथील पुणे लेनवरील केबल-स्टेड ब्रीजवर हा अपघात झाला. अपघातग्रस्त तिन्ही गाड्या मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. यातील फॉर्च्युनर गाडी अचानकपणे मिसिंग लिंकवरील केबल स्ट्रे पूलाजवळ तिसऱ्या मार्गिकेवर थांबली. त्यामुळे मागून येणारी हुंदाई कंपनीची कार वेगाने येऊन फॉर्च्युनर गाडीवर आदळली. यानंतर वेरना गाडीने आणखी एका कारला जोरदार धडक दिली.

सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page