१ वर्षापूर्वीच्या दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात मालमत्ता गुन्हे शाखेस यश…

ambernath – अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील दाखल एका चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीस अटक करण्यात ठाणे मालमत्ता गुन्हे शाखेस यश आले आहे. नितिन चोळेकर असे याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, एक वर्षांपूर्वी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सदरबाबत चोरीचा गुन्हा दाखल होता. चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंबरनाथ गावातून पोलिसांनी नितिन चोळेकर याला अटक केली.
सदर प्रकरणी चोळेकर याने गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्हयातील चोरलेले दागिने त्याने १ वर्षांपूर्वी कैलास कॉलनी, अंबरनाथ येथील सोनाराकडे विकले असल्याचे सांगितले. दरम्यान, गुन्ह्याच्या पुढील तपासाकरिता चोळेकर याला शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा/साबळे, पोहया/भांगरे, पोहवा /संदीप भांगरे, पोहवा /महेश साबळे, पोहवा / अनुप कामत यांनी केली आहे.