कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामावर KDMC चा हातोडा…

kalyan – कल्याण पूर्वेतील अनधिकृत बांधकामावर कल्याण डोंबिवली महापालिकेने तोडक कारवाई केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अंकुश दुबे यांनी दिलेल्या माहितीवरून कल्याण पूर्वेतील मयंक अपार्टमेंट बाजूला, गॅस कंपनी रोड, कैलास नगर, काटेमानिवली येथे हि कारवाई करण्यात आली.
काटेमानिवली येथे यापूर्वीही महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर ठिकाणी पुन्हा नव्याने बांधकाम करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अंकुश दुबे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याबाबत महापालिकेला माहिती दिली.

महापालिकेने याची तात्काळ दखल घेतली असता, त्याठिकाणी विनापरवानगी नव्याने बांधकाम सुरु असल्याचे दिसून आल्याने महापालिकेने अतिक्रमण विरोधी पथका मार्फत त्याठिकाणी एकूण २ गाळ्यांवर जेसीबी च्या सहाय्याने तोडक कारवाई केली आहे.
दरम्यान, सदर बांधकामधारकांवर महाराष्ट्र राज्य प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियमच्या (MRTP) विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील असे केडीएमसी सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी सांगितले आहे.