kalyan

kalyan: वडवली रोडवर रेसिंग, स्टंटबाजी करणाऱ्यास अटक…

kalyan – कल्याण पश्चिमेतील भंडारी चौकाकडे जाणाऱ्या नवीन वडवली रोडवर रेसिंग, स्टंटबाजी करणाऱ्यास अखेर खडकपाडा पोलिसांनी अटक केली. मनिष मनवानी ते याचे नाव आहे. यासोबतच पोलिसांनी तीन गाड्या जप्त केल्या आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, भंडारी चौकाकडे जाणाऱ्या नवीन वडवली रोडवर अज्ञात कार चालकाने भरधाव वेगात गाडी चालवत मोटार सायकलला मागून धडक दिली. या धडकेत मोटार सायकलवरील व्यक्तीस गंभीर दुखापत झाली याबाबत मोटार

सायकलचालकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गु.रं.नं । ९१/२०२६ भा. न्या. सं ११०,२८१,१२५ (अ) (ब) सह मोटार वाहन कायदा कलम १३४ (अ) (ब), १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे मनिष मनवानी यास अटक करून त्याच्याकडून तीन गाड्या जप्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page