kalyan

केडीएमसी आयुक्त गोयल यांच्या बदलीची मागणी…

dombivali – कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांची तात्काळ बदली करून त्यांच्या जागी कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना लक्ष्मण हजारे, युवराज सुर्ले, दिलीप मगर या सामान्य नागरिकांनी निवेदन दिले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत असलेली डोंबिवली तसेच कल्याण डोंबिवली महापालिका अत्यंत संस्कृत समजली जाते, परंतु सध्या कार्यरत असलेले आयुक्त अभिनव गोयल यांनी या डोंबिवलीला नरक पुरी डोंबिवली/ केडीएमसी करून ठेवली असल्याचा आरोप जनतेकडून होत आहे.

शहरातील सार्वजनिक कामे, आरोग्यसेवा, बेकायदेशीर बांधकामे हे सर्व भ्रष्टाचार पद्धतीने आणि भ्रष्टाचारावर अवलंबून आहे अशी शहरात चर्चा आहे. याबाबत जनतेत संताप लाट /नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

केडीएमसी आयुक्तांकडे काही बाबतीत तक्रार अर्ज केला असता आयुक्त तक्रार अर्जाला केराची टोपली दाखवतात. कोणत्याही प्रकारे नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. कल्याण डोंबिवलीतील गंभीर प्रश्नांकडे आयुक्तांचे संपूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसते. त्यामुळेच आयुक्तांच्या बदलीची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page